AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला कुठलं खातं द्यायचं यासाठी वेळ लागतोय, पण येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल- विजयकुमार गावित

Vijaykumar Gavit : मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित यांनी भाष्य केलंय.

कुणाला कुठलं खातं द्यायचं यासाठी वेळ लागतोय, पण येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल- विजयकुमार गावित
| Updated on: Aug 12, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी भाष्य केलंय. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. “पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता आमदार विजयकुमार गावित यांनी भाष्य केलंय. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

“पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित म्हणालेत.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचं नाव आलं नाही. तर हा केवळ पहिला टप्पा असून त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल पण हे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच असतात असं म्हणत केसरकरांनी दुहेरी भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित खात्यामध्ये काम करण्यास आवडेल असेही कडूंनी सांगितले होते. पण मंत्रिमंडळातच समावेश झाला नसल्यानं ते नाराजी लपून राहिलेली नाही. तर त्यांची मनधरणी आता सर्वच नवनियुक्त मंत्र्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व मंत्र्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होणार हे देखील पहावं लागणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.