हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा; भाजपचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Demand to Close Maharashtra Madarsa)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:07 PM, 15 Oct 2020

मुंबई : हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Demand to Close Maharashtra Madarsa)

महाराष्ट्रातील मदरसे वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे आणि तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवावी. तसेच मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली.

शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिजवी यांनी तर मदरस्यांना आतंकवादी संघटनाकडून सुद्धा पैसे पुरवले जातात. त्यामुळे सर्व राज्यांनी मदरसांवर बंदी घालून मुस्लिम विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच कोणाच्याही दबावाला बळी न पडता धाडसी निर्णय घ्यावा, अशी मागणी सुद्धा अतुल भातखळकर यांनी केली.

काल आसाम सरकारने आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे अतुल भातखळकरांनी स्वागत करत आसाम सरकारचे अभिनंदन केले. (BJP MLA Atul Bhatkhalkar Demand to Close Maharashtra Madarsa)

संबंधित बातम्या : BJP MLA Atul Bhatkhalkar Demand to Close Maharashtra Madarsa

मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’तील आमिर खानप्रमाणे, माजी कृषिमंत्र्यांचा बोचरा वार

भाजपशासित राज्यांत राज्यपालांकडून अस्थिरता निर्माण का केली जात नाही? संजय राऊतांचा सवाल