वाढीव वीज बिलांविरोधात आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक, नायगावात वीज बिलांची होळी

वाढीव वीजबिलांविरोधात नायगाव येथे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 12:13 PM, 23 Nov 2020
वाढीव वीज बिलांविरोधात आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक, नायगावात वीज बिलांची होळी

मुंबई : वाढीव वीज बिलांविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपकडून आज आंदोलन (BJP ptotest against increased electricity bills) करण्यात येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजप ही आंदोलनं करणार आहे. दरम्यान नायगाव येथे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कोळंबकर यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर वीबिलांची होळी पेटवून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच वंदे मातरमच्या घोषणादेखील दिल्या. या आंदोलनात 100 हून अधिक भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोळंबकर यावेळी म्हणाले की, सरकार निधी देत नाही. गोरगरिबांनी 30 हजार रुपयांपर्यंतची वीजबिलं कशी भरायची? राज्य सरकारने वीजबिलं माफ केली नाहीत, तर येत्या निवडणुकांमध्ये मतदार या सरकारला माफ करणार नाहीत. राज्य सरकारकडे इतर विभागांसाठी द्यायला निधी आहे, परंतु वीजबिलांसाठी निधी नाही. नितीन राऊतांच्या विभागाला निधी दिला तर वीजबिल ते माफ करू शकतात. असं सूचक विधान कोळंबकर यांनी यावेळी केलं.

संजय राऊतांबाबत बोलताना कोळंबकर म्हणाले की, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. परंतु या आंदोलनात राजकारणाचा काही भाग नाही. नागरिकांना त्रास झाला तर आम्ही बोलायचं नाही का? गोरगरिबांनी गप्प बसायचं का? अन्याय सहन करायचा का? असे सवाल कोळंबकर यांनी उपस्थित केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत आम्ही केंद्र सरकारशी बोलू, पण वाढीव वीजबिलांबाबत राज्याशीच बोलणार ना. राज्य सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू. आम्ही गप्प बसणार नाही. सरकारला विजबीलं माफ करावीच लागतील.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात आंदोलनं केली जाणार आहेत. तसतचे नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन विरोध करणार- बावनकुळे

नागपुरात माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, “कोट्यवधी जनता वाढीव वीजबिलामुळे भरडलेली आहे. या सरकारनं वीजबिल माफ केलं नाही, म्हणून आम्ही वीजबिलांची होळी केली. महाराष्ट्रात 2 हजार ठिकाणी वीजबिलांची होळी होणार आहे. तरीही सरकार ऐकलं नाही आणि कोणी वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्यांना विरोध करतील”.

संबंधित बातम्या

सरकार पलटलं, वाढीव वीजबिलामुळे जनता भरडली; बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

वीजबिले जबरदस्तीने वसूल करणारी ठाकरे सरकारची ही जुलमी राजवट; प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात