पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला

corona free village competition : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'कोरोनामुक्त गाव' (Corona free village) स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हल्लाबोल केला आहे.

पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला
Gopichand Padalkar_Hasan Mushrif
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 11:38 AM

राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ (Corona free village) स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल पडळकरांनी केला आहे. यावेळी पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना थेट टार्गेट केलं. (BJP MLC Gopichand Padalkar attacks on Maharashtra Minister Hasan Mushrif NCP over corona free village competition)

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”.

‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?

‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?‘ हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडला आहे. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही करोनामुक्तीची स्पर्धा आणली आहे, असं पडळकर म्हणाले.

या योजनेच्या व्यवस्थापणेचे सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला शून्य गुण आहेत. या बाप्याने हे 22 निकष ठरवताना कुठेही या पथकांना किंवा व्यवस्थापणेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे, असं म्हणत पडळकरांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला.

‘ही तर भूलथापांची मालिका’

खरंतर या 50 लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपायचीही मदत तर केलीच नाही, पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’ भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

कोरोनामुक्त गाव स्पर्धा 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धा (Corona free village) घोषित केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona free gaon) कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.

VIDEO : गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

संबंधित बातम्या 

राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल…

Special Report | गाव कोरोनामुक्त करा, 50 लाख कमवा!

(BJP MLC Gopichand Padalkar attacks on Maharashtra Minister Hasan Mushrif NCP over corona free village competition)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.