AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथरावांची कन्या, पंकजा मुंडेची ‘सावली’, जाणून घ्या प्रीतम मुंडेंचा राजकीय प्रवास

Pritam Munde | पंकजा मुंडेंच्या तुलनेत प्रीतम या राजकारणात बऱ्याच उशीरा आल्या. मात्र, गेल्या सहा वर्षांच्या खासदारकीच्या टर्ममध्ये प्रीतम मुंडे यांनी बऱ्यापैकी आपले बस्तान बसवले आहे. पंकजा मुंडे यांच्या छायेत प्रीतम मुंडे या काहीशा झाकोळल्या जात असल्या तरी आपल्या बहिणीला साथ देण्याची भूमिका त्या अत्यंत चोखपणे बजावत आहेत.

गोपीनाथरावांची कन्या, पंकजा मुंडेची 'सावली', जाणून घ्या प्रीतम मुंडेंचा राजकीय प्रवास
प्रीतम मुंडे, भाजप खासदार
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराण्याचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा आणि प्रीतम (Pritam Munde) या त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढे नेला. यापैकी गोपीनाथरावांच्या उत्तराधिकारी असलेल्या पंकजा मुंडे या सातत्याने चर्चेत असतात. अलीकडच्या काळात मुंडे भगिनी भाजपमधील आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रवासात प्रीतम मुंडे या पंकजांच्या पाठिशी ठामपणे उभ्या आहेत.

पंकजा मुंडेंच्या तुलनेत प्रीतम या राजकारणात बऱ्याच उशीरा आल्या. मात्र, गेल्या सहा वर्षांच्या खासदारकीच्या टर्ममध्ये प्रीतम मुंडे यांनी बऱ्यापैकी आपले बस्तान बसवले आहे. पंकजा मुंडे यांच्या छायेत प्रीतम मुंडे या काहीशा झाकोळल्या जात असल्या तरी आपल्या बहिणीला साथ देण्याची भूमिका त्या अत्यंत चोखपणे बजावत आहेत.

कोण आहेत प्रीतम मुंडे?

प्रीतम मुंडे यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1983 रोजी झाला. प्रीतम मुंडे यांनी 2005 साली डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 2010 पर्यंत प्रीतम मुंडे यांनी एम.डी. चे शिक्षण पूर्ण केले. त्या पेशाने त्वचारोग तज्ज्ञ होत्या. 2009 मध्ये प्रीतम मुंडे यांचा विवाह नाशिकच्या गौरव खाडे यांच्याशी झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आहे.

प्रीतम मुंडे यांचा राजकीय प्रवास

2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी काँग्रेस नेते अशोक पाटील यांचा तब्बल 7 लाख मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. तर 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली होती.

पंकजा मुंडेंची सावली

मध्यंतरी प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये पंकजा यांनी प्रीतमला आपली सावली म्हटले होते. मुंडे भगिनींचा गेल्या काही वर्षातील राजकीय प्रवास पाहता हे विधान तंतोतंत खरे ठरते.

केंद्रातलं मंत्रिपद थोडक्यात हुकलं

नुकत्या झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणारच, अशी अटकळ बहुतेकांनी बांधली होती. मात्र, शेवटच्या क्षणी चक्रे फिरली आणि मंत्रिपदाची माळ पंकजा मुंडे समर्थक असलेल्या डॉ. भागवतराव कराड यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. यावर पंकजा यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाजपमध्ये मुंडे भगिनींची होणारी घुसमट पाहता पंकजा आणि प्रीतम मुंडे आगामी काळात वेगळी राजकीय वाट चोखाळण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.