भाजपचा मास्टरस्ट्रोक, पवारांना थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर, केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद देण्याचीही तयारी-सूत्र

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपने थेट राष्ट्रपतीपदाची (BJP offer president post to Sharad Pawar) ऑफर दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

भाजपचा मास्टरस्ट्रोक, पवारांना थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर, केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद देण्याचीही तयारी-सूत्र
सचिन पाटील

|

Nov 20, 2019 | 10:40 AM

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना, भाजपने मेगाप्लॅन केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपने थेट राष्ट्रपतीपदाची (BJP offer president post to Sharad Pawar) ऑफर दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. संसद भवनात होणाऱ्या या भेटीत महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा होणार आहे. (BJP offer president post to Sharad Pawar)

एकीकडे ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा होणार असली, तरी दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीला मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीने भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत केल्यास, राष्ट्रवादीला राज्यात आणि केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदं देण्यात येतील. शिवाय शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपद मिळू शकतं.

भाजपची राष्ट्रवादीला ऑफर?

महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करावी यासाठी शरद पवारांवर राष्ट्रवादीच्याच दोन खासदारांचा दबाव आहे. शिवाय अजित पवारांचेही मन वळवण्याचे प्रयत्न या दोन खासदारांकडून सुरु आहेत. भाजपसोबत सत्तेत गेल्यास, केंद्रात तीन मंत्रिपदे, राज्यातील सत्तेत मोठा वाटा आणि जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद असा फॉर्म्युला भाजपने राष्ट्रवादीला ऑफर केल्याची माहिती, टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केली आहे.

‘भाजपसोबत जाणार नाही’

दरम्यान, भाजपने ऑफर दिल्याची माहिती समोर येत असली, तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. मात्र शरद पवार यांची हल्लीची काही विधानं पाहिली तर संभ्रमात टाकणारी आहेत.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महासेनाआघाडीचं सरकार सत्तेत येईल असं शिवसेनेकडून सातत्याने सांगितलं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल असा दावा करत आहेत. त्यासंदर्भात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकाही सुरु आहेत.

सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

राज्यात महासेनाआघाडीच्या सरकार स्थापनेसाठी आज दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आहे. सरकार स्थापनेबाबत ही कदाचीत शेवटची बैठक असेल, असं राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. शिवाय राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची केवळ अफवा आहे, असंही तटकरेंनी सांगितलं.

शरद पवार-सोनिया गांधींची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी दोन दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.  या भेटीनंतर शरद पवार म्हणाले, “सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.  महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू, वरिष्ठ नेत्यांचं मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. एवढीच चर्चा झाली. शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही ”

संबंधित बातम्या 

शिवसेना पुन्हा कोंडीत, पाठिंब्याबाबत शरद पवार- सोनिया गांधींमध्ये चर्चाच नाही! 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें