AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब
Pankaja Munde birthday banner
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 11:46 AM
Share

संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या म्हणजे 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे. (BJP Pankaja Munde birthday Banner in Parli  but photos of BJP leaders are missing)

पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांना धीर 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं होते. पण यानंतर खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला होता.

Pankaja Munde birthday banner

Pankaja Munde birthday banner

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची नाराजी

पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Pankaja Munde birthday banner

Pankaja Munde birthday banner

एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही 

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.

(BJP Pankaja Munde birthday Banner in Parli  but photos of BJP leaders are missing)

संबंधित बातम्या : 

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष वार

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.