दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिलं. खूप कष्टाने लोक त्या पदावर पोहोचत असतात. त्यांना त्या पदावरून खेचून मी माझी शक्ती वाया घालवणार नाही आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. (pankaja munde)

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा
pankaja munde

मुंबई: कुणालाही पदावरून खाली खेचून मला माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं सांगतानाच शक्तीच दाखवायची असती आणि दबावच आणायचा असता तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. (i don’t believe in pressure tactics politics, says pankaja munde)

पंकजा मुंडे यांनी आज आपल्या समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा सूचक इशारा दिला. लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक आमदार खासदारांना निवडून दिलं. खूप कष्टाने लोक त्या पदावर पोहोचत असतात. त्यांना त्या पदावरून खेचून मी माझी शक्ती वाया घालवणार नाही आणि माझी शक्ती या मंडपात पुरणारही नाही. शक्ती दाखवायची असती आणि दबाव आणायचा असता तर दबाव तंत्रासाठी ही जागा पुरणारन नाही. मला जर दबाव तंत्र करायचा असेल तर मला फार मोठी जागा लागे. पण मला दबाव आणायचाच नाही, असं पंकजा यांनी सांगितलं. आम्ही कधीच कुणाच्या समोर कधीच कुठलीही मागणी केली नाही, असंही त्या म्हणाल्या.

मोदींनी झापलं नाही

मी दिल्लीत गेले. अनेकांनी चर्चा केली. माध्यमांनी बातम्या चालवल्या. काहींनी चांगलं वृत्तांकन केलं. तर काहींनी पंतप्रधानांनी मला झापल्याच्या बातम्या दाखवल्या. माझ्या चेहऱ्यावरून बोलण्यावरून मला फटकारलं असेल असं वाटतं का? असा सवाल करतानाच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटले. त्यात शंभर टक्के संघटनेचा विषय होता. पंतप्रधानांनी प्रेमपूर्वक आणि सन्मानजनक वागणूक दिली, असंही त्यांनी सांगितलं.

नेत्यासाठी कार्यकर्ता शहीद होऊ नये

प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे आपल्या नेत्याचं काय होणार ही कार्यकर्त्यांना चिंता होती. त्यांच्या मनात द्वंद होतं. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या कार्यकर्ते अधिक आक्रमक आहेत. त्यांच्यासाठी हे धर्मयुद्धच आहे. मी पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचं स्पष्ट केल्यावरही त्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे मी त्यांना सांगितलं मला या धर्मुयद्धात पडायचं नाही. नेत्याच्या पदासाठी कार्यकर्ता शहीद व्हावा, त्यांची पदे जावी असं वाटत नाही. माझ्यासाठी त्यांची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत, असं त्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. माझ्या वाट्याला सतत संघर्ष आला आहे. माझा कार्यकर्ता दुखावला गेला आहे. त्यामुळे मी मोकळी व्यक्त झाले. महाराष्ट्राचे राजकारण आणि पॅटर्न आम्हाला माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं. (i don’t believe in pressure tactics politics, says pankaja munde)

संबंधित बातम्या:

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह, पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?

ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, पंकजा मुंडेंचा भाजपला पहिला जाहीर इशारा; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे फेटाळले

मी लालची नाही, सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

(i don’t believe in pressure tactics politics, says pankaja munde)

Published On - 2:25 pm, Tue, 13 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI