बडा नेता कोण? दुसरं -तिसरं कोणी नाही, खडसेंचीच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. (BJP Senior Leader Eknath Khadse May Join NCP) 

बडा नेता कोण? दुसरं -तिसरं कोणी नाही, खडसेंचीच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

मुंबई : भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. हा बडा नेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेच असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल सुरु आहे. मंत्रिपदावरुन उचलबांगडी केल्यापासून ते विधानसभा आणि विधानपरिषदेचं तिकीट कापण्यापर्यंत, आपली मुस्कटदाबी झाल्याचा खडसेंचा आरोप आहे. (BJP Senior Leader Eknath Khadse May Join NCP)

एकनाथ खडसे यांनी याबाबत उघड उघड भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला त्रास दिला, त्यांनीच आपलं तिकीट कापलं, त्यांच्यामुळेच आपलं मंत्रिपद गेलं, असे थेट आणि बोचरे वार एकनाथ खडसे यांनी वारंवार केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अशी चर्चा होत असताना, एकनाथ खडसेंचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून पाटील-देवकर यांची मतेही जाणून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. खडसे पक्षात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील बदलणारी गणितं आणि त्याचा पक्षाला होणारा फायदा-तोटा यासह खडसेंना संघटनात्मक जबाबदारी द्यायची की त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, खडसे यांच्यासह भाजपच्या खासदार आणि खडसे यांच्या कन्या रक्षा खडसे याही राष्ट्रवादीत येणार का? यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं. तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील नाराज नेते, पदाधिकारी यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांचं पूनर्वसन करण्यावरही चर्चा झाल्याचं बोललं जातं. मात्र, याबाबत राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

एकनाथ खडसे यांनी काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. “मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही (Eknath Khadse Jalgaon). मी स्वस्थ बसणारा राजकारणी नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल”, असं खडसे म्हणाले होते. (BJP Senior Leader Eknath Khadse May Join NCP)

संबंधित बातम्या : 

NCP Meeting | जळगावातील भाजप नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राष्ट्रवादीची महत्वाच्या बैठकीत रणनीती

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *