Raj Thackeray : मुंबई महापालिकेसाठी मनसेने रणशिंग फुंकले, स्वतंत्र लढवणार निवडणूक..राज ठाकरे काय म्हणाले..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 8:19 PM

Raj Thackeray : मुंबई महापालिकेसाठी मनसेने रणशिंगे फुंकले आहे..

Raj Thackeray : मुंबई महापालिकेसाठी मनसेने रणशिंग फुंकले, स्वतंत्र लढवणार निवडणूक..राज ठाकरे काय म्हणाले..
स्वबळाचा नारा
Image Credit source: सोशल मीडिया

कोल्हापूर : मुबंई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) रणशिंग फुंकले आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र (Independent) लढविण्याचा घोषणा केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकासाठी इतर पक्ष आघाडी, युतीच्या वाटाघाटीत रंगलेले असताना, मनसे मात्र एकला चलो रे चे नारा दिला आहे.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे पडघम यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासूनच वाजत आहे. पण या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आता या निवडणुका येत्या फेब्रुवारी वा मार्च महिन्यात होण्याची चर्चा रंगली आहे. त्यादृष्टीने मनसे कंबर कसली आहे.

भाजपला छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चावर राज ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच सोलून काढले. आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्यात, असे म्हणत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. कोल्हापूरातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पुढील पावलं टाकणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

बालेकिल्ले हलत असतात. यापुढेही हलत राहतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. आता हा इशारा ठाकरे गटाला आहे का? याचे उत्तर येत्या काळात मिळेलच. पण आपण इतरांसाठी नाहीतर आपल्या पक्षासाठी काम करत असल्याचे खरमरीत उत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

भाजप 1952 साली स्थापन झाली तर शिवसेनेचा जन्म 1966 मध्ये झाला आहे. त्यांना 1985 साल उजाडावं लागलं, मुंबई महापालिका हाती यायला, तर भाजपला पूर्ण बहुमतासाठी 2014 पर्यंत वाट पहावी लागली, मनसेकडून करण्यात येणाऱ्या अपेक्षाबाबत त्यांनी असं उत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा

आपल्या पक्षाला 16-17 वर्षे झाल्याचे सांगत मनसे मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शिवसेना मुंबई पुरती मर्यादित असल्याचे बोलल्या जात होतं. पण राज्यात त्यांची सत्ता आल्याची आठवणही ठाकरे यांनी करुन दिली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI