भाजपचा मेगाप्लॅन, महाराष्ट्रात हायटेक रॅलीचं नियोजन, 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणार

लॉकडाऊनमधून हळूहळू शिथीलता मिळत असताना आता भाजपने मेगाप्लॅन तयार केला आहे. (BJP to hold virtual rallies). भाजपने हायटेर रॅलीचं नियोजन केलं आहे.

भाजपचा मेगाप्लॅन, महाराष्ट्रात हायटेक रॅलीचं नियोजन, 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणार
Follow us
| Updated on: Jun 01, 2020 | 11:15 AM

नागपूर : लॉकडाऊनमधून हळूहळू शिथीलता मिळत असताना आता भाजपने मेगाप्लॅन तयार केला आहे. (BJP to hold virtual rallies) भाजप आता राज्यभर लवकरच हायटेक रॅली सुरु करणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. या प्लॅननुसार, भाजप राज्यातील पाच लाख कुटुंब आणि 25 लाख लोकांपर्यंत पोहोचून, केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या मदतीची माहिती देणार आहे.

तब्बल 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं भाजपचं नियोजन आहे. केंद्रातील पॅकेजमधून काय मिळालं आणि काय हवं याबाबत भाजप व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. (BJP to hold virtual rallies)

केंद्रातील आणि राज्यातील नेते या व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सहा विभागात ही व्हर्च्युअल रॅली घेण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात लवकरच या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्हर्च्युअल रॅलीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचं राज्य सरकारवर टीकास्त्र 

दरम्यान, भाजपने राज्यातील कोरोना संसर्गावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत, मात्र योग्य वैद्यकीय सुविधा लोकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. “देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांची फेकाफेकी महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला होता.

वाचा : सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस

राणेंची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी

दुसरीकडे भाजप खासदार नारायण राणे, सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, महाराष्ट्रातील रुग्णालये लष्कराच्या ताब्यात देऊन, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली होती. मात्र ही राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचं स्पष्टीकरण भाजपने दिलं होतं.

(BJP to hold virtual rallies)

संबंधित बातम्या  

सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.