AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता येणार – टीव्ही ९ मराठी एक्सिट पोल

हिमाचल प्रदेशात आप तसेच इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही, असा एक्झिट पोल आहे.

गुजरातमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता येणार - टीव्ही ९ मराठी एक्सिट पोल
| Updated on: Dec 05, 2022 | 7:17 PM
Share

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर केला जातोय. गुजरातमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता येणार, असा टीव्ही ९ मराठीचा एक्झिट पोल आहे. गुजरातमध्ये भाजपला १२५ ते १३० जागा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या पारड्यात ४० ते ५० जागा पडण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी यावेळी जास्त जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन ते ७ जागांवर अपक्ष बाजी मारू शकतील. तसेच ३ ते ५ जागा आपला मिळण्याची शक्यता आहे. हा फक्त अंदाज आहे. निकाल ८ डिसेंबरला येणार आहे. गुजरातमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता येण्याची शक्यता टीव्ही ९ मराठीचा एक्झिट पोल आहे.

हिमाचल प्रदेशात ६८ जागांसाठी मतदान झालंय. हिमाचल प्रदेशात ३४ ते ३९ जागा भाजपला मिळण्याचा एक्झिट पोल टीव्ही ९ नं जाहीर केलाय. काँग्रेसला २८ ते ३३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात आप तसेच इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही, असा एक्झिट पोल आहे. याचा अर्थ हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नवं नाही. गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता गुजरातमध्ये आहे. हे घवघवित यश आहे. अँटी इनकंहबन्सी असते. पण, भाजपला याचा फटका बसणार नाही. १२५ पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असंही उपाध्ये यांनी सांगितलं.

काँग्रेसचे राजू वाघमारे म्हणाले, एक्झिट पोल हे शेवटी अंदाज आहेत. आमच्या अंदाजाप्रमाणे यापेक्षा जास्त जागा मिळतील. ८० ते ८५ पर्यंत जागा काँग्रेसला मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केला.

आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.