पनवेल मनपावर भाजपची एकहाती सत्ता, स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी

पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजप नगरसेवक संतोष शेट्टी यांची निवड झाली आहे.

पनवेल मनपावर भाजपची एकहाती सत्ता, स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी

मुंबई : पनवेल महापालिकेच्या (Panvel Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदी (Standing Committee Chairman) भाजप नगरसेवक संतोष शेट्टी तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय प्रभाग समिती ‘अ’ सभापतीपदी अनिता पाटील, प्रभाग समिती ‘ब’ सभापतीपदी समीर ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ सभापतीपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती ‘ड’ सभापतीपदी सुशील घरत यांची निवड झाली आहे.

माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप-आरपीआयची एक हाती सत्ता असल्याने या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार आज निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व प्रभाग समिती सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

 

संबंधित बातम्या

पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी, पाच जणांना अटक, वनविभागाची यशस्वी कारवाई

पनवेलचा कुख्यात डॉन राजा कैकाडीला खंडणीप्रकरणी अटक, मेड इन USA पिस्तूल जप्त

Panvel Update | पनवेल महापालिका मुख्यालय 3 दिवस बंद

पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढवण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेच्या तक्रारीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्तांकडे कारवाईची शिफारस

(BJP’s one-sided power over Panvel Municipal Corporation, Santosh Shetty as Standing Committee Chairman)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *