AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 Ward No 179 BPT Colony : काँग्रेसची पुन्हा विजय मिळवण्यासाठी धडपड, तर भाजपचा सत्तेसाठी जोर; जाणून घ्या मतदारसंघाची परिस्थिती

वॉर्डातील स्वच्छतेचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यावेळीही ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरु झाला तर नालेसफाईची बोंब आहे. अनेक ठिकाणच्या गटारे आणि नाल्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराईला निमंत्रण मिळण्याची भीती आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत जो पक्ष आग्रही भूमिका घेईल, त्या पक्षाला मतदारांची पहिली पसंती मिळेल, अशी चर्चा आहे.

BMC election 2022 Ward No 179 BPT Colony : काँग्रेसची पुन्हा विजय मिळवण्यासाठी धडपड, तर भाजपचा सत्तेसाठी जोर; जाणून घ्या मतदारसंघाची परिस्थिती
महापालिका निवडणूक 2022Image Credit source: TV9
| Updated on: Jun 13, 2022 | 12:31 AM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामगिरीचा केवळ देश नव्हे, तर जगभर डंका वाजला जातो. इथल्या प्रशासकीय व्यवस्थापनाचे सर्वत्र उदाहरण दिले जाते. लोकसंख्येचा मोठा ताण असूनही या शहराच्या मूलभूत गरजांवर कधी त्याचा परिणाम झालेला नाही. इथल्या जनतेला पाणी असो वा वीज, या अत्यावश्यक सुविधांपासून कधी वंचित राहण्याची वेळ आलेली नाही. मात्र इतर गैरसोयींचा पाढाही तितकाच मोठा आहे. यंदा महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक (Election) होतेय. त्यानिमित्ताने जनता त्यांच्या दारी येणाऱ्या राजकीय पक्षांकडे या समस्यांचा पाढा वाचण्यास सज्ज झाली आहे. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 179 मध्येही जवळपास अशीच परिस्थिती आहे. सध्या या वॉर्डचे नेतृत्व काँग्रेसच्या सुफियान नियाज अहमद वानू यांच्याकडे होते. त्यांच्या कारकिर्दीत किती विकासकामे (Development Works) झाली, यावर त्यांच्या पुनरागमनाची परीक्षा होणार आहे. काँग्रेसने हा वॉर्ड (Ward) पुन्हा आपल्याकडे राखण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. परंतु पालिकेवर आपला भगवा फडकवण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपकडून कोणती व्यूहरचना आखली जातेय, यावर काँग्रेसच्या स्वप्नाचे भवितव्य अवलंबून आहे.

वॉर्ड क्रमांक 179 ची नेमकी सीमा व त्यात कोणकोणते भाग मोडतात?

वॉर्ड क्रमांक 179 हा मुंबई शहर आणि उपनगरांच्या मध्यावर असलेला प्रभाग आहे. या वॉर्डाच्या उत्तरेला वॉर्ड क्रमांक 177 (रावजी गणात्रा मार्ग), पूर्वेकडे वॉर्ड क्रमांक 180 (शेख मिशिरी दर्गा लेन), दक्षिणेला वॉर्ड क्रमांक 201 (बीपीटी कॉलनी) आणि पश्चिमेला वॉर्ड क्रमांक 177 आणि 178 (मध्य रेल्वे मार्गिका) या सीमा लागून आहेत. या वॉर्डमध्ये शेख मिशिरी दर्गा, काणे नगर, बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क या प्रमुख वस्तीचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनातृष्णा चंद्रकांत विश्वासराव-
भाजपबाबुभाई भवानजी-
राष्ट्रवादी काँग्रेससय्यद आरिफ अब्दुल सलाम-
काँग्रेसमुफ्ती नियाज वानूमुफ्ती नियाज वानू
मनसेअनंत लक्ष्मण कांबळे-
अपक्ष / इतरलोहाळे संतोष लहानू -

वॉर्डमधील लोकसंख्या

वॉर्ड क्रमांक 179 मध्ये सर्वच धर्मिय मतदार आहेत. वॉर्डची एकूण लोकसंख्या 57013 आहे. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील 3302 मतदार असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदारांची लोकसंख्या 810 इतकी आहे.

2017 च्या निवडणुकीतील चित्र.. उमेदवार कोण होते?

मागील निवडणुकीत काँग्रेसच्या मुफ्ती नियाज वानू विजयी झाल्या होत्या. त्यावेळी सय्यद शब्बीर बावा मिया (AIMIM), सय्यद आरिफ अब्दुल सलाम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सर्फराज अली फोडकर (समाजवादी पक्ष), अनंत लक्ष्मण कांबळे( महाराष्ट्र नवनिर्माण सेना), तृष्णा चंद्रकांत विश्वासराव (शिवसेना), बाबुभाई भवानजी (भारतीय जनता पार्टी), गर्जे प्रविण पांडुरंग (अखिल भारत हिंदू महासभा), वैशाली विजय शर्मा (भारिप बहुजन महासंघ), वैश्य कमला रामसेवक (अपक्ष), मोहम्मद गौश अहमद शेख (अपक्ष), शेखर परदेशी (अपक्ष), लोहाळे संतोष लहानू (अपक्ष), खतीब अख्यातारी बेगम जैनुद्दीन (अपक्ष), ऍड. अशोक मधुकर खरे हे उमेदवार रिंगणात उतरले होते.

वॉर्डातील प्रमुख समस्या कोणकोणत्या आहेत?

वॉर्डातील स्वच्छतेचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यावेळीही ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरु झाला तर नालेसफाईची बोंब आहे. अनेक ठिकाणच्या गटारे आणि नाल्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराईला निमंत्रण मिळण्याची भीती आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत जो पक्ष आग्रही भूमिका घेईल, त्या पक्षाला मतदारांची पहिली पसंती मिळेल, अशी चर्चा आहे. (Brihanmumbai municipal corporation elections mahanagar palika nivadnuk 2022 ward 179 bpt colony election maharashtra news in marathi)

'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.