Shivsena : मोठी बातमी! बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

Buldana Shiv Sena Politics : बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेत ठाकरेंच्या वतीने करण्यात आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला.

Shivsena : मोठी बातमी! बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
जोरदार राडाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 1:53 PM

बुलढाणा : बुलढाण्यात (Buldana Shiv sena News) शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही (Buldana Lathi Charge) करावा लागला. मोठा तणाव यावेळी निर्माण झाला होता. शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरेंनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते अशा दोघांमध्ये यावेळी घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. हा राडा नियंत्रणात आणताना पोलिसांना अखेर आपली सगळी शक्ती पणाला लावाली लागली होती. यादरम्यान एकच गोंधळ निर्माण झाला होता.

नेमकं काय घडलं?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला. आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते हे शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना त्या कार्यक्रमात घुसल्याचं सांगितलं जातंय. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांसमोरच हा राडा झाला. यावेळी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला. ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी शब्दाला शब्द वाढत गेला आणि पोलिसांसमोर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत हा सगळा राडा शांत करण्याचा प्रयत्न केला.

बुलडाण्यात हायव्होल्टेज ड्रामा!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अख्ख्या बुलडाण्यातील आमदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या नियुक्त्या बुलडाण्यात करण्यात आल्या होत्या. या नव्या नियुक्त्यांना आव्हान देण्यासाठी हा राडा करण्यात आल्याचं दिसून आलं. नुकतीत बुलडाण्याचे शिवसेना खासदार आणि आमदार, तसंत शिंदे गटाला समर्थन दिलेले सगळे जण एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट घेण्यासाठी बुलडाण्यातील सर्वजण मुंबईत आलेले होते. या भेटीला अवघे काही दिवसच उलटलेत. त्यानंतर आज बुलडण्यात तुफान राडा झाल्याचं दिसून आलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.