आदित्यसोबत भद्रा मारोतीचं दर्शन, चंद्रकांत खैरेंचा अर्ज दाखल

आदित्यसोबत भद्रा मारोतीचं दर्शन, चंद्रकांत खैरेंचा अर्ज दाखल

औरंगाबाद: शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे यांनी खुलताबाद येथील भ्रद्रा मारोतीचे दर्शन घेऊन, आपला अर्ज दाखल केला. भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन, दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि उमेदवारी अर्ज भरला. भद्रा मारोती हे खुलताबाद येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. चंद्रकांत खैरे यांचं ते श्रद्धास्थान आहे.

दरम्यान चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे मुंबईहून औरंगाबादला दाखल झाले होते. चंद्रकांत खैरे यांनी सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेतले आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला उमेदवार अर्ज भरला. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

चंद्रकांत खैरे विरुद्ध सुभाष झांबड

दरम्यान, औरंगाबादेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे खैरे विरुद्ध झांबड असा सामना रंगणार आहे. मात्र झांबड यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. इतकंच नाही तर त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयातील स्वत:च्या खुर्च्याही नेल्या.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

संबंधित बातम्या

काँग्रेस सोडल्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यलायातील खुर्च्याही घरी नेल्या! 

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?  

काँग्रेसची नववी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 4 उमेदवार घोषित 

Published On - 3:35 pm, Sat, 30 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI