काँग्रेस सोडल्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यलायातील खुर्च्याही घरी नेल्या!

औरंगाबाद : काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, औरंगाबादमधील पक्षाचं कार्यालयही रिकामं केलं आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या आणि साऊंड सिस्टमही घरी घेऊन गेले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसन विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षासह आमदाराकीचा …

काँग्रेस सोडल्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यलायातील खुर्च्याही घरी नेल्या!

औरंगाबाद : काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, औरंगाबादमधील पक्षाचं कार्यालयही रिकामं केलं आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या आणि साऊंड सिस्टमही घरी घेऊन गेले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसन विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षासह आमदाराकीचा राजीनामा दिला आहे.

औरंगाबादमधील काँग्रेसच्या कार्यलयात खुर्च्या आणि साऊंड सिस्टिम होती. जवळपास 300 खुर्च्या 2008 साली अब्दुल सत्तार यांनीच आणल्या होत्या. मात्र, आता काँग्रेस पक्ष सोडल्याने, सत्तार यांनी खुर्च्याही सोडल्या नाहीत. खुर्च्याही घरी नेल्या आहेत. औरंगाबादमधील शहागंज परिसरात गांधी भवन नावाने काँग्रेसचे कार्यालय आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने, आमदार अब्दुल सत्तार नाराज होते. अखेर त्यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *