हे सरकार विसंगतीवर पडणार, आज संध्याकाळीच विसंगती दिसेल : चंद्रकांत पाटील

आमचं आंदोलन 25 फेब्रुवारीला होणार आहे. तहसील कार्यालयावर आंदोलन होईल", अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Maha Vikas aaghadi) यांनी केली.

हे सरकार विसंगतीवर पडणार, आज संध्याकाळीच विसंगती दिसेल : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 17, 2020 | 1:29 PM

मुंबई :  “महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात सभागृहापासून ते रस्त्यांवर आंदोलन करणार आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. आम्ही विरोधक म्हणून काम करत राहणार. आमचं आंदोलन 25 फेब्रुवारीला होणार आहे. तहसील कार्यालयावर आंदोलन होईल”, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Maha Vikas aaghadi) यांनी केली. महिलांवरील अत्याचार, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांना मदत यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. (Chandrakant Patil on Maha Vikas aaghadi)

ही सर्व फसवणूक चालू आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्याविरोधात 25 फेब्रुवारीला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालायासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हे सरकार विसंगतावर पडणार. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला विसंगत दिसेल. तिन्ही पक्षांच्या आज बैठका आहेत तेव्हा दिसून येईल, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. यांच्यात आज संध्याकाळपर्यंत काय काय होतंय ते बघा, आम्ही काहीच करायची गरज नाही. दोन पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आपापल्या मीटिंग बोलावल्या आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आम्ही पुन्हा एकदा सरकारमध्ये येतोय अस बोललोच नाही. हे सरकार आपोआपच पडेल, पण परत सरकार बनवण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मध्यावधी निवडणुका होतील असंच मी सातत्यानं म्हणत आलोय. चोरुन सत्ता घेणाऱ्यांनी आम्हाला बोलू नये, असा टोला चंद्रकांत पाटलांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकांना लगावला.

हे सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, हे सरकार आम्ही पाडणार नाही,सरकार पडल्यावर मध्यावधी निवडणुका होणार. 5 वर्ष त्यांचं संतुलन बिघडलेलं होतं, त्यांना डॉक्टरांची गरज आहे, असंही उत्तर चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांना दिलं.

आमच्यामुळ ते जिंकलेत, वेगवेगळ लढलो असतो तर यांच्या 54 जागा आल्या असत्या का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला.

इंदोरीकर महाराज दिवसाला 80 कीर्तन करतात. ते मार्मिकपणे टीका करत असतात. इंदोरीकर महाराज यांचे समर्थन मी करत नाही. त्यांनी असं म्हणायला नको होतं. पण ते जनप्रबोधन करतात, त्यातलं एखादं वाक्यावर इतका वाद? मीडियाला विनंती की एखाद्याची तपश्चर्या वाया जाऊ देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था राहील याची काळजी घेतली, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला.

आमचा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. ‘सामना’मध्ये छापून आले, ते गुजरातबद्दल बोलतात,तुम्ही मुंबई महापलिकेच बोला, पावसाळ्यात पाणी भरते त्यावर बोला, ते का लपवून ठेवता? छापताना थोडं तरी विचार करा, असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला.

गुजरात राहू द्या आधी मुंबईचं काय ते बघा. इथले पैसे जातात कुठे? आम्हाला ‘सामना’च्या सर्टीफिकेटची गरज नाही. पाऊस पडला की मुंबई तुंबते त्याचं आधी काय करताय का? असा सवाल त्यांनी विचारला.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.