AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही’

चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

'चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही'
| Edited By: | Updated on: Nov 26, 2020 | 3:36 PM
Share

पंढरपूर : शिवसेनेनं (Shivsena) धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला खडसावलं आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ (Pune Graduate Teachers Constituency) कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. (Chandrakant Patil criticized on shivsena and mahavikas aghadi in pandharpur)

या मेळाव्यादरम्यान, चंद्रकांत पाटीलांनी सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी अपयशी ठरले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. खरंतर, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याच सामन्यात दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

दरम्यान, आज मेळाव्या आधी चंद्रकांत पाटील यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची भेट घेतली. देशमुख यांच्या सोलापुरातील सांगोला इथल्या निवासस्थानी ही भेट झाली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. 95 वर्षांच्या तरुणाची क्रेझ आजही सांगोला मतदारसंघात आहे. त्यामुळे आबासाहेबांच्या समर्थकांचं पाठबळ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. (Chandrakant Patil criticized on shivsena and mahavikas aghadi in pandharpur)

इतर बातम्या –

Chandrakant Patil | शरद पवार कदाचित सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

चंद्रकांत पाटील लॉटरी लागून झालेले आमदार, दमछाक होऊन नवव्या फेरीत जिंकले : सतेज पाटील

(Chandrakant Patil criticized on shivsena and mahavikas aghadi in pandharpur)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.