बारामतीत पवारांची कोंडी केल्याची पावती, पुण्याचं पालकत्व चंद्रकांत पाटलांकडे?

पुणे : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलंय. विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शतप्रतिशत कमळ फुलवायचंय. यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या जागेवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देऊन पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देता येणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र …

बारामतीत पवारांची कोंडी केल्याची पावती, पुण्याचं पालकत्व चंद्रकांत पाटलांकडे?

पुणे : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलंय. विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शतप्रतिशत कमळ फुलवायचंय. यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या जागेवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देऊन पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शह देता येणार आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलंय. त्यामुळे आतापासून रणनीती तयार करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे संसदेत गेल्यामुळे आता पुण्याच्या पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पुन्हा पवार कुटुंबीयांची कोंडी करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आखलेल्या रणनीतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चांगलीच दमछाक झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करण्याचं नियोजन भाजपने केलंय.

पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांच्या निवडीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एका दगडात अनेक पक्षी मारता येणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *