चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज, अशोक चव्हाण यांचा पलटवार

चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज, अशोक चव्हाण यांचा पलटवार
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 6:08 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये चांगलंच राजकारण रंगलंय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात तर जोरदार चिखलफेक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांनी औकातीत राहावं असा दम चंद्रकांत पाटील यांनी भरला आहे. त्याला आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. (Chandrakant Patil needs mental treatment- Ashok Chavan)

सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केलीय. भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे, हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटलांनी चव्हाणांना दम भरला

चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असा दमच चंद्रकांत पाटलांनी भरला आहे. मीडियाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले.

अजितदादांनी सारथीसाठी काय केलं?

फडणवीस सरकारने ज्या सवलती मराठा-ओबीसी समाजाला जाहीर केल्या होत्या. त्या सवलती तातडीने मराठा-ओबीसींना तातडीने द्याव्यात, असं सांगतानाच सारथीसाठी महिन्याभरात अजित पवारांनी काय केलं? असा सवालही त्यांनी केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज मर्यादा 25 लाख करा. अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे ऑन दी स्पॉट निर्णय घ्या, अण्णासाहेब पाटील महामंडळाला स्वायत्ता द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं; चंद्रकांत पाटलांचा दम

VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

Chandrakant Patil needs mental treatment- Ashok Chavan

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.