राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thacketay) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच 'कृष्णकुंज'वर ही भेट झाली.

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 12:49 PM

मुंबई :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thacketay) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर ही भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती की या दोन बड्या नेत्यांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली? राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरुनच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील सांगितला. (Chandrakant patil Press Conference After MNS Raj Thackeray Meeting)

युतीची चर्चा नाही तर एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा

“आजच्या बैठकीत युतीची कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल, पण युतीची चर्चा नाही तर एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा झाली. कारण त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या काही भूमिका मला समजून घ्यायच्या होत्या. कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून.. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. त्यासाठी आजची भेट झाली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

मनसे- भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

मी विद्यार्थी परिषदेत होतो. तेव्हा राज ठाकरे BVS चे काम करायचं. तेव्हापासून माझ्या मनात यांच्याबद्दल आकर्षण होतं, व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आहेच.. राज ठाकरेंना भूमिका बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते व्हायला हवे हे मी माणूस म्हणून सांगणं वेगळं.. सध्या मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला ते ही जातात मी ही जातो, आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी.. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली.

राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा, यात गैर काय?, असंही राज म्हणाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भेटीचा प्लॅन कसा ठरला?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज साहेब ठाकरे यांची माझी नाशिकला अचानक भेट झाली. तेही प्रवासात होते, मी ही प्रवासात होतो. त्यावेळी आमचं बोलणं झालं, मुंबईत केव्हातरी घरी भेटूया… कोणतीही महाराष्ट्रातली दोन माणसं भेटली तर आपसूक चहाला घरी या, म्हणतो… आज राज ठाकरेंशी चर्चा झाली. पहिला प्रश्न आहे की भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष राजसाहेबांच्या घरी का गेले?, भाजप प्रदेश कार्यालयात का गेले नाहीत?, मुळात मी असा अहंकार बाळगणारा नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.

(Chandrakant patil Press Conference After MNS Raj Thackeray Meeting)

हे ही वाचा :

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.