AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दानवे-मुनगंटीवार-पाटील, भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत (Maharashtra State President). मात्र, यामध्ये प्रामुख्याने तीन नावं चर्चेत आहेत.

दानवे-मुनगंटीवार-पाटील, भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?
| Updated on: Jan 14, 2020 | 10:02 PM
Share

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत (Maharashtra State President). मात्र, यामध्ये प्रामुख्याने तीन नावं चर्चेत आहेत. पहिलं नाव म्हणजे भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, दुसरं नावं भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि तिसरं नाव म्हणजे माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार. या तिन्ही नावांमधला एक समान दुवा म्हणजे हे तिन्ही जण याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. दानवेंचा स्वभाव बिनधास्त असला तरी पक्षसंघटनेत त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्याच नेतृत्वात केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल झाला. अनेक जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ताही काबीज केली. मात्र, केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा चंद्रकांत पाटलांकडे आली.

रावसाहेब दानवे कोण आहेत?

रावसाहेब दानवे हे भाजपचा मराठवाड्यातला प्रमुख मराठा चेहरा आहेत. ते जालन्यातून सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तळागाळातून पुढे आलेले नेते म्हणूनही दानवेंची ओळख आहे. शिवाय, ग्रामपंचायतीपासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या दानवेंकडे प्रदेशाक्षध्यपदाचा अनुभव ही त्यांच्या जमेची बाजू आहे.

दानवेंनंतर सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव चर्चिलं जातं आहे. सुधीर मुनगंटीवार आक्रमक आहेत. शिवाय, विदर्भावर पुन्हा होल्ड मिळवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांना प्रदेशाध्यपद दिलं जाणं फायद्याचं ठरेल, अशी चर्चा सुरु आहे.

सुधीर मुनगंटीवार कोण आहेत?

सुधीर मुनगंटीवार हे जवळपास 6 वेळा आमदार राहिले आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जवळचे नेते म्हणूनही मुनगंटीवारांची ओळख राहिली आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतील तिसरं नाव म्हणजे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील मितभाषी असले तरी त्यांच्याच काळात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ऐतिहासिक आकडे मिळवले. मात्र, भाजपविरोधी बाकांवर बसल्याने, शिवाय राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर आक्रमक चेहरा हवा, असं बोललं जातं आहे.

चंद्रकांत पाटील कोण आहेत?

चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात प्रवेश केला. ते मितभाषी स्वभावासाठी ओळखले जातात. संघटन बांधणीत त्यांचं मोठं योगदान आहे. उत्तम संघटन बांधणी आणि काटेकोर नियोजन या चंद्रकांत दादांच्या उजव्या बाजू आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अमित शाहांचे सर्वात विश्वासू नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

सूत्रांच्या माहितीनुसार, हायकमांडचीही चंद्रकांत पाटील यांच्याच नावाला पसंती आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यात यशस्वी ठरतात की नाही, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Who Will Be The Next Maharashtra President Of BJP

पाहा व्हिडीओ :

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.