ओबीसी आणि मराठा समाजात सरकारच वाद निर्माण करतयं; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

काही राजकीय पक्षांकडून ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. चव्हाण यांच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

ओबीसी आणि मराठा समाजात सरकारच वाद निर्माण करतयं; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 4:18 PM

पुणे: काही राजकीय पक्षांकडून ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (ashok chavan ) यांनी केला होता. चव्हाण यांच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांनी पलटवार केला आहे. राज्य सरकारच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम करत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil reaction on ashok chavan statement)

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारच वाद निर्माण करण्याचं काम करत आहे. राज्याचे मंत्री ऊठसूठ प्रो ओबीसी वक्तव्य करत आहेत, असं सांगतानाच आम्ही ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र ठेवण्याचं काम केलं. आम्ही हे आरक्षण टिकवलं. पण राज्यातील आघाडी सरकार फूट पाडून राज्य करण्याचं काम करत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

समीर ठक्कर अटक प्रकरणीही त्यांनी सरकारवर टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त काही लोकांसाठीच आहे का? असा सवाल करतानाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही लोकांसाठीच असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समीर ठक्कर प्रकरणी सरकार दंडुकेशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार का, हे आता अनिश्चित आहे, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्या. तयारी झाली नाही, सतरा दिवसात तयारी कशी करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे, असं पाटील म्हणाले. राज्यातील संघटन मजबूत करण्यासंदर्भात जिल्ह्या-जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी काल दिलं होतं. (chandrakant patil reaction on ashok chavan statement)

संबंधित बातम्या:

मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…

‘मेट्रो’वरुन राजकारण तापले; कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने लावला बोर्ड

(chandrakant patil reaction on ashok chavan statement)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.