AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आक्रोश’ दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज झुकणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सरकारला ठणकावले

सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. या घटनेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध नोंदवला आहे. (chandrakant patil)

'आक्रोश' दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज झुकणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सरकारला ठणकावले
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई: सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. या घटनेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध नोंदवला आहे. सोलापूरच्या मोर्च्यात आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला ठणकावले आहे. (chandrakant patil slams maha vikas aghadi over Maratha Akrosh Morcha in solapur)

चंद्रकांत पाटील यांनी एक प्रेस नोट काढून हा निषेध व्यक्त केला आहे. तसेच सरकारने प्रचंड दडपशाही करूनही मराठा समाजातील आंदोलकांनी मोर्चा काढला, याबद्दल त्यांनी आंदोलकांचे अभिनंदनही केले. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने आजच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील गावोगावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री-पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये यासाठी दडपशाही केली. मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी कालपासूनच नोटिसा बजावल्या होत्या. पण अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

आघाडी सरकारचा मराठा समाजावर राग

भाजपा सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाचा संताप उसळेल

मराठा समाजाने सोलापूरमध्ये आज आयोजित केलेला मोर्चा राजकीय नव्हता. तेथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. भाजपचे कार्यकर्तेही पक्षाचा झेंडा आणि बिल्ला बाजूला ठेवून सहभागी झाले होते. पण मराठा समाजाचे आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आता आवाजही दडपायचा आहे असे दिसते. पण त्यांचा हा हेतू सफल होणार नाही. ते जितकी दडपशाही करतील तितका मराठा समाजातील संताप उफाळेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असंही ते म्हणाले. (chandrakant patil slams maha vikas aghadi over Maratha Akrosh Morcha in solapur)

संबंधित बातम्या:

आज सांगून मोर्चा काढला, उद्या न सांगता मोर्चा काढू, मग पाहू काय होते ते; नरेंद्र पाटलांचा इशारा

आता तारीख नाही, अ‍ॅटॅक होईल, मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका: नरेंद्र पाटील

VIDEO: ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला; सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चा; अनेकांची धरपकड

(chandrakant patil slams maha vikas aghadi over Maratha Akrosh Morcha in solapur)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.