VIDEO: ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला; सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चा; अनेकांची धरपकड

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. (narendra patil)

VIDEO: 'एक मराठा...लाख मराठा'चा आवाज पुन्हा घुमला; सोलापुरात हजारो मराठ्यांचा आक्रोश मोर्चा; अनेकांची धरपकड
Maratha Akrosh Morcha
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 1:58 PM

सोलापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संचारबंदीचे आदेश झुगारून हजारो मराठा तरुणांनी या मोर्चात भाग घेतला. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्चात हजारो तरुण सहभागी झाल्याने पोलीस यंत्रणांचेही धाबे दणाणले. त्यामुळे पोलिसांनी अनेकांची धरपकड केल्याने आंदोलक प्रचंड संतप्त झाले होते. (narendra patil organised Maratha Akrosh Morcha For Maratha Reservation in solapur)

मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी संचारबंदी लागू असल्याचं आणि कोरोनाचं कारणही देण्यात आलं होतं. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली. त्यामुळे नरेंद्र पाटीलही संतप्त झाले होते.

मोर्चात रेटारेटी

दुपारी या मोर्चात प्रचंड गर्दी झाली. यावेळी पाटील थेट गर्दीत गेले. त्यांनी आंदोलकांना संबोधित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अचानक मोर्चात ढकलाढकली सुरू झाली. गर्दी प्रचंड होती. या गर्दीतून वाट काढत प्रत्येकजण पाटलांच्या दिशेने येत होता. त्यामुळे रेटारेटी सुरू झाली होती.

दोन खासदार, आठ आमदारांची उपस्थिती

यावेळी माढाचे माजी खासदार रणजित नाईक-निंबाळकर उपस्थित होते. जोपर्यंत ग्रामीण भागातील लोक मोर्चाच्या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत मोर्चा काढणार नाही, असा इशारा नाईक-निंबाळकर यांनी दिला. त्यामुळे संभाजी चौकात एकच गर्दी झाली होती. या मोर्चाला आठ आमदार आणि दोन खासदार उपस्तति होते. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मोर्चात भाग घेतला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मोर्चा काढला जात आहे. त्यामुळे सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

ब्रिटीशांपेक्षाही वाईट सरकार

सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती. पण महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले. राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली. ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप करतानाच ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका पाटील यांनी केली. (narendra patil organised Maratha Akrosh Morcha For Maratha Reservation in solapur)

संबंधित बातम्या:

आज सांगून मोर्चा काढला, उद्या न सांगता मोर्चा काढू, मग पाहू काय होते ते; नरेंद्र पाटलांचा इशारा

एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही; महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, संजय राऊतांचं सूचक ट्विट

(narendra patil organised Maratha Akrosh Morcha For Maratha Reservation in solapur)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.