असले प्रश्न संजय राऊतांना विचारा, पत्रकारांना उत्तर देत चंद्रकांतदादांचे मिश्कील हास्य

ओबामांनी आत्मचरित्रामध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस असा केल्याबद्दल चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला

असले प्रश्न संजय राऊतांना विचारा, पत्रकारांना उत्तर देत चंद्रकांतदादांचे मिश्कील हास्य

सातारा : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आत्मचरित्रामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा उल्लेख नर्व्हस असा केल्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रश्न विचारला असता याविषयी मला माहित नाही, पण असले प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारा, असा टोला लगावत चंद्रकांतदादा मिश्कील हसले. (Chandrakant Patil takes gig at reporter asks him to question Sanjay Raut on Barack Obama)

“अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा” असं म्हणत एका पत्रकाराने चंद्रकांतदादांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. “अरे बाबा अमेरिका वगैरे नको, संजय राऊतांना विचारा” असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं. तरीही पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. “बराक ओबामा यांनी आत्मचरित्रामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस आणि कमी योग्यतेचा असा केला आहे, त्यावर काय म्हणाल?” असं पत्रकाराने विचारलं. त्यावर “अरे एवढं वाचन नाही माझं, संजय राऊतांना विचारा” असं हसत-हसत सांगून चंद्रकांत पाटील निघाले. साताऱ्यात आज भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

ओबामा काय म्हणतात?

राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे, पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) या पुस्तकात मांडले आहे.

“सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार”

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे आणि आत्महत्या केलेले इंटिरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेवून अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकात पाटील यांना विचारण्यात आ सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार ला. किरीट सोमय्या यांनी काँक्रीट पेपर काढले आहेत, ते खोटे असतील तर त्यांनी (शिवसेना) कोर्टात जावे. लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी तो खोडावा, असंही पाटील म्हणाले. (Chandrakant Patil takes gig at reporter asks him to question Sanjay Raut on Barack Obama)

“या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?” असा सवाल करत “आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही?” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारला. “मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करुन कलमे लावली जातात. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. गेल्या 11 महिन्यापासून या सरकारचा जो हैदोस चालू आहे हे सर्वसामान्य जनता पाहत आहे” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

(Chandrakant Patil takes gig at reporter asks him to question Sanjay Raut on Barack Obama)

Published On - 3:04 pm, Fri, 13 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI