AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुख्यमंत्री मुंबईपर्यंत तर उपमुख्यमंत्री पुण्यापर्यंत सीमित’, सरकार बोल बच्चन असल्याचाही बावनकुळेंचा घणाघात

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाविकास आघाडी सरकार हे बोल बच्चन सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुंबईपर्यंत, तर उपमुख्यमंत्री हे पुण्यापर्यंतच सीमित असल्याची घणाघाती टीकाही बावनकुळे यांनी केलीय.

'मुख्यमंत्री मुंबईपर्यंत तर उपमुख्यमंत्री पुण्यापर्यंत सीमित', सरकार बोल बच्चन असल्याचाही बावनकुळेंचा घणाघात
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 2:30 PM
Share

भंडारा : भाजपचे प्रदेश महामंत्री आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाविकास आघाडी सरकार हे बोल बच्चन सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुंबईपर्यंत, तर उपमुख्यमंत्री हे पुण्यापर्यंतच सीमित असल्याची घणाघाती टीकाही बावनकुळे यांनी केलीय. ते आज भंडाऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ( Chandrasekhar Bavankule criticizes CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar)

महाविकास आघाडी सरकारचा, पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवैध धंदे फोफावले आहेत. नाना पटोले स्वत:ला ओबीसींचा नेता म्हणतात. मात्र, ओबीसींचे प्रश्न मार्गी लावत नाहीत. त्यांना ओबीसी समाजाबाबत येवढाच कळवळा असेल तर पटोले यांनी ताबडतोब सरकारमधून बाहेर पडावं, असं आव्हानही बावनकुळे यांनी पटोलेंना दिलंय. भारतीय जनता युवा मोर्चाच्या “युवा वॉरिर्यस” शाखेच्या उदघाटन निमित्ताने बावनकुळे भंडारात आले होते.

‘हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण’

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. यापूर्वीच्या 18 महिन्यात सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. आता अध्यादेशामध्ये काय राहील हे पाहावे लागेल. मात्र, आमची सरळ मागणी आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम राहिलं पाहिजे. सध्याच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या रद्द करुन त्यातही ओबीसींचं पूर्ण आरक्षण लागू केलं पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

‘..तर काँग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं’

सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच तसा आरोप केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असं वंजारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?, असा सवाल करतानाच ओबीसींचा एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, असं आव्हानच बावनकुळे यांनी काँग्रेसला दिलं होतं.

इतर बातम्या :

नागपूर ZP पोटनिवडणूक : महाविकास आघाडी तुटल्यात जमा, शिवसेनेचे सर्व जागांवर उमेदवार

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय : उद्धव ठाकरे

Chandrasekhar Bavankule criticizes CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.