Chandrashekhar Bawankule : बारामतीसाठी खास प्लॅन, केंद्रातील 9 मंत्री महाराष्ट्रात फिरणार; कसं आहे भाजपचं ‘मिशन लोकसभा’?

Chandrashekhar Bawankule : अमोल मिटकरी यांच्याबाबत काय बोलणार? त्यांना त्यांच्या पक्षाने काय अधिकार दिले? पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या कधीही राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकत नाही.

Chandrashekhar Bawankule : बारामतीसाठी खास प्लॅन, केंद्रातील 9 मंत्री महाराष्ट्रात फिरणार; कसं आहे भाजपचं 'मिशन लोकसभा'?
बारामतीसाठी खास प्लॅन, केंद्रातील 9 मंत्री महाराष्ट्रात फिरणार; कसं आहे भाजपचं 'मिशन लोकसभा'?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 11:59 AM

नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपच्या (bjp) प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या सर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी बावनकुळे यांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बुथ लेव्हलपासून भाजपची बांधणी सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर काही केंद्रीय मंत्रीही महाराष्ट्रात दौरे करून संघटन बांधणीला बळ देणार आहेत. सप्टेंबरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीतत केलं असलं तरी बारामतीवर खास लक्ष दिलं आहे. स्वत: चंद्रशेखर बावनकुळे बारामतीवर लक्ष ठेवून असल्याने शरद पवारांच्या बारामतीत भाजप चमत्कार घडवेल का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात 9 केंद्रीय मंत्री 6 वेळा प्रवास करणार आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही 48 मतदारसंघात काम करत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांचा दौरा आहे. मी सुद्धा बारामती मतदारसंघात संघटन बांधणीचा दौरा करणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

राष्ट्रवादीत काय चाललंय ते पाहा

जयंत पाटील यांनी सत्तेत असल्याच्या मानसिकतेतून बाहेर यावं, काही दिवस आराम करावा. आता महाविकास आघाडीत धुसफूस आहे. ते जयंत पाटील यांनी पाहावं. राष्ट्रवादीत काय चाललं? याबाबत जयंत पाटील यांनी लक्ष द्यावं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे बड्या नेत्या

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमोल मिटकरी यांच्याबाबत काय बोलणार? त्यांना त्यांच्या पक्षाने काय अधिकार दिले? पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या कधीही राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकत नाही. मिटकर यांच्या पक्षाचं पुढे काय होणार? याबाबत मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलून घेतलं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

कामं पुन्हा सुरू व्हावी

फडणवीस सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्टे दिला होता, ती कामं पुन्हा सुरु व्हावी. नागपूरच्या 45 विविध विषयांवर मी आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नागपूरचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.