कामाला लागा, छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश; आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जाण्याचा दावा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागा. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (ZP Elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत. आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात येणार असले तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असंही भुजबळ म्हणाले.

कामाला लागा, छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश; आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जाण्याचा दावा
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 8:02 PM

नाशिक : आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करूनच लढविल्या जातील. कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जवळ करणार नाही, असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी स्पष्ट केलंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागा. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (ZP Elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत. आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात येणार असले तरी देखील महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असंही भुजबळ म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायत निवडणूकांच्या पूर्व तयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकहिताचे कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केले.

‘निवडणुकीला सामोरे जाताना आपापसातील मतभेद बाजूला ठेवा’

आगामी निवडणुकीत आपण सर्व ताकदीने उतरणार आहोत. पवार साहेबांच्या विचारानुसार महिला आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्यात येईल. निवडणुकीची सुरुवात ही मतदार पडताळणी पासून सुरु होत असते. कारण बोगस मतदान करण्यासाठी काही पक्षांकडून मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट केले जातात याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. मतदार यादीत किती खरे आणि किती खोटे मतदार आहेत, याची पडताळणी करून मतदार नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक असल्यास तक्रारी दाखल करण्यात याव्यात, असंही भुजबळ म्हणाले. तसंच ग्राम पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यात येऊन आगामी ग्रामपंचायत, सोसायटी, बाजार समित्या, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवावी. निवडणुकीला सामोरे जात असतांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

7 डिसेंबर पासून सर्व तालुक्यात कार्यकर्ता मेळावे

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने 7 डिसेंबर पासून सर्व तालुक्यात कार्यकर्ता मेळावे घेण्यात येणार असल्याचं रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तसंच 12 डिसेंबर या पवारांच्या वाढदिवशी तालुकावार व्हर्चुअल रॅली काढण्यात येणार आहे. तर 14 डिसेंबर पासून तालुकावार विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे देखील पगार यांनी बोलतांना सांगितले.

इतर बातम्या :

‘नारायण राणेंनी जरा जास्तच मुदत दिली, त्यांचे खास आभार’, जयंत पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.