कोल्हापुरातून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णींना का डावललं? भुजबळांचा चंद्रकांतदादांना चिमटा

कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी काल दिलं होतं.

कोल्हापुरातून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णींना का डावललं? भुजबळांचा चंद्रकांतदादांना चिमटा
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 1:09 PM

नाशिक : कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना डिवचलं. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी काल दिलं होतं. (Chhagan Bhujbal taunts Chandrakant Patil asks why Medha Kulkarni denied ticket from Pune)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते. यावेळी भुजबळ बोलत होते.

“(राज्यपाल) महोदय यांच्या उपस्थितीत येत्या 2 वर्षांत सर्व इमारती बांधा” अशी कोपरखळी छगन भुजबळांनी मारली. त्याला लागलीच राज्यपालांनीही उत्तर दिलं. तब तक क्या सीन रहेगा? या कोश्यारींच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले “हम तब भी आपके साथ ही रहेंगे” या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर एकच हशा पिकला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुणे हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.” असं चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढवली होती. तत्कालीन भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन चंद्रकांतदादांना सीट देण्यात आली होती. हा विषय त्यांच्यासाठी नेहमीच त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जातात. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

मेधा कुलकर्णी कोण आहेत?

मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं.

विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते.

मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती. (Chhagan Bhujbal taunts Chandrakant Patil asks why Medha Kulkarni denied ticket from Pune)

दुसरीकडे, चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही. उलटं मी काल जे बोललो त्याला त्यांनी पुष्टीच दिली आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

भाजपात संघटनात्मक फेरबदलाचे संकेत, मेधा कुलकर्णी, बावनकुळेंना नवी जबाबदारी?

(Chhagan Bhujbal taunts Chandrakant Patil asks why Medha Kulkarni denied ticket from Pune)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.