महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडीकडून छगन भुजबळ यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे, एसीबीकडून आधीच या प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीकडून देखील छगन भुजबळ यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि इतरांकडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता. ईडने हा अर्ज मंजूर केला आहे. छगन भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.
काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अफरातफर केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथीत घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ हे दोन वर्ष जेलमध्ये देखील होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह एकूण 14 जणांची नावं होती. हा कथीत घोटाळा अंदाजे 850 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातं, या प्रकरणात आरोप झाल्यानं छगन भुजबळ चांगले अडचणीत आले, ते दोन वर्ष तुरुंगात देखील होते. मात्र त्यानंतर त्यांना या प्रकरणात आधी एसीबीकडून दोष मुक्त करण्यात आलं, त्यानंतर आता त्यांना ईडीने देखील दिलासा दिला आहे. ईडकडून देखील आता छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि इतरांकडून ईडीकडे निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला होता, तो आता ईडीने मंजूर केला आहे. भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
