AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य, नेमकं काय म्हणाले? वाचा…

राज्याच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य, नेमकं काय म्हणाले? वाचा...
Devendra Fadnavis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2025 | 5:44 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. दोन्ही पक्षांकडून या युतीचे संकेत मिळाले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेल. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरुन मी योग्य वेळी बोलेल.’

उद्धव ठाकरेंच सूचक विधान

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बघु, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’. मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल? यावर प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला.शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ”.

संजय राऊतांकडूनही युतीचे संकेत

मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, ‘राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत.’ अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

Follow Us
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?