AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिला एक महत्त्वाचा शब्द, ‘मी कधीही….’

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आज एक महत्त्वाचा शब्द दिला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल सुद्धा ते बोलले. "आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो" असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis : आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिला एक महत्त्वाचा शब्द, 'मी कधीही....'
cm devendra fadnavis
| Updated on: Dec 25, 2024 | 1:03 PM
Share

“पुढील पाच वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत. सर्व योजनांतून जी घरे होतील, त्या लोकांना सोलर देणार आहे. घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल. त्यांना बिलच येणार नाही. हा आमचा प्रयत्न आहे. मला जी काही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल. नागपूरकर म्हणून नागपूरची मान उंच राहिली पाहिजे. आपला प्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रात बदल घडतोय अशी उंची महाराष्ट्राला देणार आहे. पारदर्शी कारभार करणार आहे” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

“आव्हानं खूप आहेत. राजकारणात सर्व स्तरावर जाऊन लोक राजकारण करतात. पण दहा वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला असेल तर कितीही आवाहन आलं तरी मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरे जात असतो. सत्ता मी कधीच डोक्यात जाऊ देत नाही. सत्ता हे सेवेचं साधन म्हणून मी पाहतो. मी माझ्या डोक्यात कधीही सत्ता जाऊ देणार नाही” असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सायबर गुन्हेगारी कशी उघड करणार?

“काही नालायक लोक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना लुबाडत आहेत. जाती जातीत द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सायबर अवेयरनेस करत आहे. सायबर सेक्युरिटीचं काम सुरू आहे. डिजीटल आणि सायबर प्लॅटफॉर्मचं एकत्रीकरण केलं आहे. जगातील बेस्ट टुल्स आपल्याकडे आहे. त्याद्वारे आपण वेगाने सायबर गुन्हे उघडकीस आणू शकतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार

“विधानसभेत बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाहीत. काही लोकांनी नक्षलवादी हा शब्द काढून टाकला. पण त्यांना माहीत नाही एखादी चुकीची गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकतो. त्याचं 100 टक्के फूटप्रिंट आम्हाला शोधता येतं. एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर तेही लगेच शोधता येतं. आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करू नये. जोपर्यंत अवेयरनेस होऊ शकत नाही, तोपर्यंत हे आव्हान राहणारच आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.