मोदींच्या पावलावर पाऊल, निकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथाच्या चरणी

फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रचाराच्या धामधुमीनंतर केदारनाथला (CM Devendra Fadnavis Kedarnath) जाऊन धार्मिक विधी पार पाडले.

मोदींच्या पावलावर पाऊल, निकालापूर्वी मुख्यमंत्री केदारनाथाच्या चरणी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निकालाच्या अगोदर केदारनाथला (CM Devendra Fadnavis Kedarnath) जाऊन दर्शन घेतलं. पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्यासोबत होत्या. फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रचाराच्या धामधुमीनंतर केदारनाथला (CM Devendra Fadnavis Kedarnath) जाऊन धार्मिक विधी पार पाडले. मोदींनीही लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी केदारनाथला जाऊन ध्यानसाधना केली होती.

24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येत असल्याचा अंदाज विविध एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. देशासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं राज्य महाराष्ट्र विधानसभा निकालाकडे देशाचं लक्ष आहे. ‘मी पुन्हा येणार’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचेही संकेत दिले होते.

राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र ही पंतप्रधानांची घोषणा पाच वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. यावेळीही मोदींच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांनीही जोरदार प्रचार करत महाराष्ट्र पिंजून काढला. फडणवीसांनी निकालानंतर भाजपच्या दिग्गज नेत्यांसाठी आयकॉन असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पावलावर पाऊल टाकत देवदर्शनाचा मार्ग धरला.

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर उत्तराखंडमधील केदारनाथचा मार्ग धरला होता. केदारनाथ हे देवस्थान चार धाम यात्रेतील अविभाज्य घटक आहे. मोदींनी केदारनाथला दर्शन घेत विकासकामांचाही आढावा घेतला होता.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI