दिल्लीत दिग्गजांच्या भेटीगाठी, पवार सोनियांच्या भेटीला, फडणवीस शाहांना भेटणार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (4 नोव्हेंबर) नवी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत

दिल्लीत दिग्गजांच्या भेटीगाठी, पवार सोनियांच्या भेटीला, फडणवीस शाहांना भेटणार
Follow us
| Updated on: Nov 04, 2019 | 8:48 AM

नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (4 नोव्हेंबर) नवी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत (CM Fadnavis to meet Amit Shah). राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्य़ांना मदत करावी, यासाठी आज मुख्यमंत्री शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीनिमित्त ही भेट होत असली, तरी राज्यातील सत्ता स्थापनेवरही या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, दिल्लीतच आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट होणार आहे (Sharad Pawar to meet Sonia Gandhi). तसेच, सत्ता स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत (Sanjay Raut to meet Governor Koshyari).

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, यासाठी मुख्यमंत्री शाहांची भेट घेणार आहेत. तर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरदूत केली आहे. या भेटीमागे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं कारण असलं तरी यादरम्यान राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता सोडवण्यासाठीही मुख्यमंत्री अमित शाहांचा सल्ला घेऊ शकतात. तसेच, शिवसनेला कुठलं खातं द्यायचं, कुठलं पद द्यायचं याबाबतही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : ‘बाळासाहेब ठाकरे हयात असते तर…’, रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

शरद पवार -सोनिया गांधींची भेट

सत्ता स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी ही विरोधी पक्षातच राहणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतर आता शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीदरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा होऊ शकते.

संजय राऊत राजभवनावर

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळालेल्या पक्षाला आमंत्रित करावं, अशी मागणी सजय राऊत राज्यपालांकडे करणार आहेत. म्हणजेच राज्यपालांना भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे अशी मागणी ते करणार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र आहे.

हेही वाचा : साहेब, जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचा अजित पवारांना मेसेज

सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत खडाजंगी

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 12 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने अजूनही सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र, सत्ता स्थापनेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....