AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात..

शिवसेना-भाजप ही 25-30 वर्षांची युती तुटली आणि महाविकास आघाडी बनली. आता ही आघाडी किती वर्ष टिकेल या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं.

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात..
शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 5:38 PM
Share

मुंबई : शिवसेना-भाजप ही 25-30 वर्षांची युती तुटली आणि महाविकास आघाडी बनली. आता ही आघाडी किती वर्ष टिकेल या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या (Loksatta) मुलाखतीत सेना-भाजप युती आणि महाविकास आघाडीवर रोखठोक भाष्य केलं. (CM Uddhav Thackeray loksatta interview comment on Mahavikas aaghadi and shiv sena BJP Yuti)

मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोनामुळे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही. शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी 25-30 वर्ष युती केली, ती प्रेमाने केली आणि टिकवली. एका दिलाने, विचाराने एकत्र राहिलो. काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आमची युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. युती किंवा आघाडी कशासाठी होते?”

युती 30 वर्ष टिकली, मग आघाडी किती टिकणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल”

पुन्हा भाजप-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात तर या अफवाच आहेत का?, असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो.

यावेळी उद्धव ठाकरेंना सेना भाजप एकत्र येऊ शकतात का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल.

संबंधित बातम्या  

Special Report | राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार, पाहा खुद्द राज ठाकरेंनी दिलं उत्तर

Maharashtra unlock 5 stage : मुंबई नेमकी कोणत्या टप्प्यात?     

5 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, विनायक मेटेंचा इशारा 

(CM Uddhav Thackeray loksatta interview comment on Mahavikas aaghadi and shiv sena BJP Yuti)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.