शिवसेनेची वचनपूर्ती, मुख्यमंत्र्यांकडून पालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास परवानगी

मुंबई महानगर पालिकेमार्फ़त लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु करण्याची परवानगी दिली (CM uddhav thackeray new decision) आहे.

शिवसेनेची वचनपूर्ती, मुख्यमंत्र्यांकडून पालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास परवानगी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकामागोमाग एक असा निर्णयांचा सपाटाच लावल्याचं दिसत (CM uddhav thackeray new decision) आहे. नुकतंच त्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला अखेर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय (CM uddhav thackeray new decision) घेतला. यानंतर आता मुंबई महानगर पालिकेमार्फ़त लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु करण्याची परवानगी दिली (CM uddhav thackeray new decision) आहे.

मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर त्यातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र सुरु करु असे वचन शिवसेनेने दिलं होत. मुंबई महानगरपालिकेच्या 2002 च्या वचननाम्यात शिवसेनेनं याबाबत नमूद केले होते. नुकतंच उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबतची वचनपूर्ती करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महापालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीज निर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील. असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले (CM uddhav thackeray new decision) आहे.

उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेला केराची टोपली दाखवण्यात आली आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महामार्गाला देण्यात आलं. समृद्धी महामार्गाला (Balasaheb Thackeray samruddhi mahamarg) बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला नुकतंच मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI