फलकावरून सुशीलकुमार शिंदेंचा फोटो गायब; महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा तुफान राडा

महाविकास आघाडीतर्फे आयोजित बैठकीमध्ये आज तुफान राडा पाहायला मिळाला. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदरासंघात आपल्या उमेदाराच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीने ही बैठक आयोजित केली होती.

फलकावरून सुशीलकुमार शिंदेंचा फोटो गायब; महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा तुफान राडा
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 3:07 PM

सोलापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज राडा झाला. प्रचाराच्या बॅनर्सवर ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने शिंदे समर्थक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. राज्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीतच या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणवाचं वातावरण निर्माण झालं होतं. (commotion in meeting of mahavikas aghadi in solapur)

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यमंत्री सतेज पाटीलदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहेत. यावेळी पुणे मतदार संघातून महाविकास आघाडीचे पदवीधरच्या जागेसाठी अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सतेज पटील सोलापूरमध्ये आले होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत लावण्यात आलेल्या  बॅनरमध्ये सुशिलकुमार यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

बैठकीत सुशिलकुमार शिंदे तूम आगे बढोचे नारे

बैठकीत लावलेल्या बॅनरवर काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी बैठक रोखली. त्यांनी जोरदार नारेबाजी केली. बैठकीत त्यांनी सुशिलकुमार शिंदे आगे बढो असे नारे दिले. दरम्यान, या घोषणांमुळे बैठकीत पुरता गोंधळ उडाला. मंत्री सतेज पाटील यांनी वारंवार आवाहन करुनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाद न दिल्यामुळे बैठकीतील गोंधळ वाढतच गेला.

सतेज पाटील कार्यकर्त्यांवर भडकले

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर बैठकीत गोंधळ उडाला. सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आवाहन केले. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाद न दिल्याने शेवटी सतेज पाटील त्यांच्यावर भडकले. “बैठक चालू ठेवायची की नाही ? तुम्ही असाच गोंधळ घालत असाल तर मी निघून जाऊ का? असा सवालही त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सुशिलकुमार शिंदे यांचा फोटो बॅनरवर न लावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, यावेळीदेखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा बैठकीवर बहिष्कार

उमेश पाटील आणि सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशिलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे बॅनरवर फोटो न लावल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर झाली नाही. त्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. यावेळी फोटो न लावणे हा काँग्रेसचा आपमान असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ

यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या या राड्याची राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“तीन पक्षांमध्ये झालेली ही नैसर्गिक आघाडी नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्याने यांच्यात गोंधळ उडत राहणार. महाविकास आघाडीचे हे सरकार म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (commotion in meeting of mahavikas aghadi in solapur)

संबंधित बातम्या :

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार का?, अनिल परबांचा सवाल

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा

पदवीधर निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी, पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आज बैठक

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.