AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा

"पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील," असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येणार; जयंत पाटलांचा दावा
| Updated on: Nov 20, 2020 | 11:45 PM
Share

सातारा :पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार 50 हजारांच्या फरकाने निवडून येतील,” असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरु आहेत. सर्व पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. जयंत पाटीलदेखील पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साताऱ्यात होते. यावेळी जयंत पाटील यांनी हा दावा केला. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अनुक्रमे राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी तयारीच्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबाबत बोलताना महाविकास दोन्हीही उमेदवार 40 ते 50 हजार मतांच्या फरकाने निवडून येतील असे जयंत पाटील म्हणाले.

भाजपमुळे राज्यातील वीजवितरण गोत्यात

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांनी वीजबील न भरण्याचे आवाहन केलं आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना “भाजप सरकारच्या मागील 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी 67 हजार कोटीपर्यंत गेली,” असा  आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला. यामुळेच वीजवितरण व्यवस्था गोत्यात आली आहे, असे पाटील म्हणाले. तसेच, महावितरणची अवस्था अशी का झाली?, याची खातरजमा होण्याची गरज आहे. काल झालेल्या बैठकीत वीजबिलाबाबत कोणत्या पद्धतीच्या सवलती देता येतील यावर चर्चा झाली. यावर सध्या काम चालू आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले.

महावितरण कंपनी 11 महिन्यांत तोट्यात कशी?

महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तिन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, असा सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला विचारला.  राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बावनकुळे यांनी मागणी केली आहे. (candidate of Mahavikas Aghadi will elected by a margin of 50 thousand said Jayant Patil)

संबंधित बातम्या :

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.