राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची संपूर्ण यादी : कोणते मंत्री शपथ घेणार, कुठल्या मंत्र्यांना डच्चू?

उद्या जे 11 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यात भाजपचे 8 मंत्री, शिवसेनेचे 2 आणि रिपाइं-आठवले गटाचे एक मंत्री शपथ घेणार आहेत.

maharashtra cabinet expansion, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची संपूर्ण यादी : कोणते मंत्री शपथ घेणार, कुठल्या मंत्र्यांना डच्चू?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (16 जून) विस्तार होणार आहे. उद्या एकूण 11 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. यात विशेष म्हणजे, काँग्रेसमधून भाजपमधे आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याही गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळात कोणते नवे मंत्री शपथ घेणार आहेत, याची संपूर्ण यादी सूत्रांनी दिली आहे. ही यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

उद्या जे 11 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यात भाजपचे 8 मंत्री, शिवसेनेचे 2 आणि रिपाइं-आठवले गटाचे एक मंत्री शपथ घेणार आहेत.

भाजपच्या नव्या मंत्र्यांंची यादी?

 1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
 2. आशिष शेलार (भाजप)
 3. अनिल बोंडे (भाजप)
 4. अतुल सावे (भाजप)
 5. संजय भेगडे (भाजप)
 6. संजय कुटे (भाजप)
 7. सुरेश खाडे (भाजप)
 8. अशोक उईके (भाजप)
 9. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
 10. तानाजी सावंत (शिवसेना)
 11. अविनाश महातेकर (रिपइं-आठवले गट)

या पाच विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू :

 1. प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री
 2. राजकुमार बडोले, सामाजिक न्यायमंत्री
 3. विष्णू सावरा, आदिवासी विकास मंत्री
 4. प्रवीण पोटे, पर्यावऱण राज्यमंत्री
 5. दिलीप कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री

काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद

लोकसभा निवडणुकीत मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणमधून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने, नाराज झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर भाजपचा हात पकडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटलांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असून, ते राज्याचे आगामी कृषिमंत्री असतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेतेही ते होते.

जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद

दोन आठवड्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात क्षीरसागर शपथ घेणार आहेत. क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *