लोकसभेसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातली टीम ठरली!

नवी दिल्ली : महाराष्ट्रासाठी काँग्रेसची टीम ठरली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसने पाठवलेल्या नावांना मंजुरी दिली. मल्लिकार्जुन खर्गे – समन्वय समितीचे अध्यक्ष, सुशील कुमार शिंदे – प्रचार समिती प्रमुख आणि पृथ्वीराज चव्हाण – जाहीरनामा समिती प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय इतर नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. समन्वय समिती महाराष्ट्राचे प्रभारी असलेले …

लोकसभेसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातली टीम ठरली!

नवी दिल्ली : महाराष्ट्रासाठी काँग्रेसची टीम ठरली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसने पाठवलेल्या नावांना मंजुरी दिली. मल्लिकार्जुन खर्गे – समन्वय समितीचे अध्यक्ष, सुशील कुमार शिंदे – प्रचार समिती प्रमुख आणि पृथ्वीराज चव्हाण – जाहीरनामा समिती प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय इतर नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.

समन्वय समिती

महाराष्ट्राचे प्रभारी असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर या समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विजय आलियास बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक यांच्यासह 29 सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. तर महाराष्ट्र काँग्रेस समितीचे सचिव यामध्ये कायमस्वरुपी निमंत्रित असतील.

महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समिती

अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अशोक चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सुशील कुमार शिंदे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, शिवराज पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह 31 जणांची ही समिती आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांचंही 30 व्या क्रमांकावर नाव आहे. तर काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग आणि महाराष्ट्र काँग्रेस समितीचे सचिव कायमस्वरुपी निमंत्रक असतील.

प्रचार समिती

मोदी लाटेत पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्यावर प्रचार समितीच्या प्रमुखाची धुरा देण्यात आली आहे. लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या प्रचाराचं नियोजन या समितीकडे असेल. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, कुमार केतकर, संजय निरुपम यांच्यासह तब्बल 64 जणांची ही समिती आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी दिली आहे. त्यांचाही काँग्रेसला प्रचारात फायदा होणार आहे.

प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती

रत्नाकर महाजन (अध्यक्ष) आणि बाबा सिद्दीकी (उपाध्यक्ष) यांच्यावर प्रसिद्धी आणि प्रकाशनाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय विविध 25 सदस्यांचा या टीममध्ये समावेश आहे.

माध्यम समन्वय समिती

ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्यावर या समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसचे नेते आणि लोकसमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांचाही या समितीमध्ये समावेश आहे. अनंत गाडगीळ, सचिन सावंत, भाई जगताप यांच्यासह 20 जणांचा या समितीमध्ये समावेश आहे.

जाहीरनामा समिती

काँग्रेसच्या महाराष्ट्र जाहीरनामा समितीची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. भालचंद्र मुनगेकर, वसंत पुरके, सुरेश शेट्टी यांच्यासह 30 जणांचा या समितीमध्ये समावेश आहे.

निवडणूक व्यवस्थापन समिती, उपसमिती

विद्यमान आमदार शरद रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गणेश पाटील, शाह आलम, रमेश शेट्टी, पृथ्वीराज साठे या पाच जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. उपसमितीमध्ये सुरेश शेट्टी, भूपेंद्र गुप्ता, रामकृष्ण ओझा, प्रकाश सोनवणे, निलेश पेंढारी यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *