AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना विधानसभा, ना परिषद, काँग्रेस सोडण्याचा इशारा दिलेल्या माजी मंत्र्याला कार्यकारी अध्यक्षपद

काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. (Congress Chandrakant Handore Executive President)

ना विधानसभा, ना परिषद, काँग्रेस सोडण्याचा इशारा दिलेल्या माजी मंत्र्याला कार्यकारी अध्यक्षपद
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे
| Updated on: Feb 05, 2021 | 4:15 PM
Share

मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला. विधानसभा अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. तर त्यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे. भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या गळ्यातही कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. विधानसभेला पराभव आणि विधानपरिषदेचं तिकीट न मिळाल्याने हंडोरे पक्षावर नाराज होते. त्यामुळे हंडोरेंचं संभाव्य पक्षांतर रोखण्यास काँग्रेसला यश आल्याचं चित्र आहे. (Congress Former Minister Chandrakant Handore is new Executive President)

कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?

चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत.

काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप चंद्रकांत हंडोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे हंडोरे काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली होती.

स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा

नाशिकमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘भीमशक्ती’च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडण्यावर भर दिला जात होता. आगामी काळात भीमशक्ती संघटना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचंही चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं होतं. भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात होतं.

विधानसभेला पराभव, विधानपरिषदेचं तिकीटही नाही

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले होते, मात्र शिवेसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. त्यातच विधानपरिषदेवरही वर्णी न लागल्याने हंडोरे नाराज असल्याची माहिती होती.

काँग्रेसची नवी टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नाना पटोले

कार्यकारी अध्यक्ष

1. शिवाजी मोघे (यवतमाळ) 2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद) 3. नसीम खान (मुंबई) 4. कुणाल पाटील (धुळे) 5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई) 6. प्रणिती शिंदे (सोलापूर)

(Congress Former Minister Chandrakant Handore is new Executive President)

प्रदेश उपाध्यक्ष

1. शिरीष चौधरी (जळगाव) 2. रमेश बागवे (पुणे) 3. हुसैन दलवाई (मुंबई) 4. मोहन जोशी (पुणे) 5. रणजीत कांबळे (वर्धा) 6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद) 7. बी. आय. नगराळे 8. शरद अहेर (नाशिक) 9. एम. एम. शेख (औरंगाबाद) 10. माणिकराव जगताप (रायगड)

संबंधित बातम्या :

विधानसभेला पराभव, विधानपरिषदही नाही, काँग्रेसचे माजी मंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

काँग्रेस हायकमांडनं नियुक्त केलेली टीम नाना पटोले वाचलीत का? एका क्लिकवर सर्व नावं

(Congress Former Minister Chandrakant Handore is new Executive President)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.