गोस्वामी यांचा थेट भाजपशी संबंध, म्हणून फडणवीसांनी प्रकरण दाबले, सचिन सावंतांचा आरोप

Namrata Patil

|

Updated on: Nov 13, 2020 | 3:12 PM

या आरोपांनतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. (Sachin Sawant On Kirit Somaiya Allegations)

गोस्वामी यांचा थेट भाजपशी संबंध, म्हणून फडणवीसांनी प्रकरण दाबले, सचिन सावंतांचा आरोप

Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांनतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. (Sachin Sawant On Kirit Somaiya Allegations)

“दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.

किरीट सोमय्यांचे आरोप

>> दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी 345 कोटी दिले. दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहे. याबाबत मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

>> अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत केले.

>> रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे.  (Sachin Sawant On Kirit Somaiya Allegations)

संबंधित बातम्या : 

किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI