AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? ‘वर्षा’ निवासस्थानी घेतली भेट

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचे बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? 'वर्षा' निवासस्थानी घेतली भेट
| Updated on: Aug 14, 2024 | 2:54 PM
Share

Congress MLA meet CM Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. सध्या अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री (13 ऑगस्ट) या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर आता हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम करणार असल्याचे बोललं जात आहे.

मी काँग्रेससोबतच होतो आणि राहणार  – हिरामण खोसकर

“शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता हिरामण खोसकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली”, असे हिरामण खोसकर यांनी म्हटले.

कोणतीही राजकीय चर्चा नाही – जितेश अंतापूरकर

“मी माझ्या मतदारसंघातील एका महत्त्वाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. याच कॉमसाठी मी मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली. मला मुख्यमंत्र्‍यांनी भेटण्यासाठीची वेळ दिली होती. त्यामुळे मी भेट घेतली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही”, अशी प्रतिक्रिया जितेश अंतापूरकर यांनी केले.

शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याची चर्चा

दरम्यान काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे दोन्हीही नेते काँग्रेस हायकमांडच्या रडारवर आहेत. या दोन्हीही नेत्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या कारवाईपूर्वीच या दोन आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे शिंदे गटात प्रवेश घेणार असल्याचे बोललं जात आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?