महाराष्ट्रात काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?

मुंबई : काँग्रेस लोकसभा निवडणुकीतील पराभवातून अद्याप सावरलेली नाही. त्यातच भाजपकडून महाराष्ट्रात काँग्रेसला धक्के देणं सुरुच आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात येणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी भेट घेतली. जयकुमार गोरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे बळ मिळालंय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे …

महाराष्ट्रात काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?

मुंबई : काँग्रेस लोकसभा निवडणुकीतील पराभवातून अद्याप सावरलेली नाही. त्यातच भाजपकडून महाराष्ट्रात काँग्रेसला धक्के देणं सुरुच आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात येणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी भेट घेतली. जयकुमार गोरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे बळ मिळालंय.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याचं निश्चित झालंय. त्यांच्यासोबत काँग्रेस आणखी काही आमदार भाजपात जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत खुलासा केला होता. आम्ही सात आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याचं अब्दुल सत्तार नुकतेच म्हणाले होते. त्यामुळे गिरीश महाजनांसोबतची भेट ही भाजप प्रवेश निश्चित करण्यासाठीच असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंची काँग्रेसविरोधी भूमिका

काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माढ्याच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. विखेंसोबत जयकुमार गोरेही भाजपात जाणार असल्याचं बोललं जातंय.

अब्दुल सत्तार यांचा दावा काय?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सात आमदारांना सोबत घेऊन भाजप प्रवेश करणार असल्याचा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केलाय. 6 जूनला आपण भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली होती. राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यासह सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठं भगदाड पडणार असून, मोठी राजकीय खळबळ होऊ शकते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *