विदर्भातील 10 पैकी 9 जागा जिंकू, गडकरींचा पराभव निश्चित : विजय वडेट्टीवर

मुंबई :  विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकत आहे, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. आम्ही तर नऊ जागांबाबत कॉन्फिडन्ट अर्थात 9 जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. इतकंच नाही तर भाजप नेते नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. काँग्रेसची आज लोकसभा […]

विदर्भातील 10 पैकी 9 जागा जिंकू, गडकरींचा पराभव निश्चित : विजय वडेट्टीवर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

मुंबई :  विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी पाच जागा जिंकत आहे, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. आम्ही तर नऊ जागांबाबत कॉन्फिडन्ट अर्थात 9 जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. इतकंच नाही तर भाजप नेते नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

काँग्रेसची आज लोकसभा आढावा बैठक होती. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी विदर्भातील दहा जागांचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी या 10 पैकी तब्बल 9 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

‘नाना पटोले जिंकणार’

यावेळी वडेट्टीवार यांनी 9 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना, नितीन गडकरी यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा केला. नितीन गडकरींविरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवलं आहे. नाना पटोले हे नितीन गडकरींचा पराभव करतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

विदर्भ विभागात नागपूर, रामटेक,भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर,यवतमाळ-वाशिम, बुलडाणा,अकोला,अमरावती आणि वर्धा हे दहा मतदारसंघ येतात. या दहापैकी 9 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने विदर्भातील सर्व 10 जागा जिंकल्या होत्या.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.