काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत पुन्हा अनुपस्थित, चर्चेला उधाण!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच भाग म्हणून नाना पटोले यांनी आढावा बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे नागपूर काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना आता उधाण येत आहे. कारण, नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत यांची गैरहजेरी दिसून येत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत पुन्हा अनुपस्थित, चर्चेला उधाण!
नाना पटोलेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमाला नितीन राऊत गैरहजर


नागपूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर महापालिकेवर मागील 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसनं जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच भाग म्हणून नाना पटोले यांनी आढावा बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे नागपूर काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना आता उधाण येत आहे. कारण, नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत यांची गैरहजेरी दिसून येत आहे. (Congress program in Nagpur in the presence of Nana Patole, Nitin Raut absent)

पटोले यांच्या उपस्थितीत नागपुरात आज काँग्रेसकडून व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री सुनील केदार उपस्थित होते. मात्र, ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमात काँग्रेसकडून आज स्वातंत्र्यसेनानींचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आयोजित केलेल्या सायकल रॅलीतही नितीन राऊत उपस्थित नव्हते.

नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी!

यापूर्वी 24 जुलै रोजी पटोलेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या मार्गदर्शन शिबीरालाही नितीन राऊत गैरहजर होते. दरम्यान, यंदा काहीही करुन नागपूर महापालिकेवरचा भाजपचा झेंडा खाली उतरवायचा, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. त्या दृष्टीने काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने नाना पटोले यांनी महत्त्वाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली होती. पण या बैठकीला काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते उर्जामंत्री नितीन राऊत गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं होतं.

फडणवीसांच्या मतदारसंघातून भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना

नागपुरातील तीन विधानसभा मतदारसंघात पटोले यांच्या उपस्थितीत आढावा बैठकांचं नियोजन करण्यात आलं होतं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून नाना पटोले यांनी आढावा बैठकी घ्यायला सुरुवात केली. म्हणजेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातूनच भाजपला हादरे देण्याची व्यूव्हरचना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आखल्याचं पाहायला मिळालं होतं.

पटोले फडणवीसांच्या विरोधात शड्डू ठोकणार?

या बैठकीत बोलताना पटोले यांनी मोठं विधान केलं होतं. पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून लढेन असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर

Nitin Gadkari letter to Maha CM : “मुंबई-गोवा हायवेवर काळे फासणारे, चिखलफेक करणारे तुमच्याबरोबर, गडकरी साहेब तिथे तुम्ही गप्प का?”

Congress program in Nagpur in the presence of Nana Patole, Nitin Raut absent

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI