#RIPManiShankarAiyar ट्विटरवर ट्रेन्ड होतोय! गोंधळून जाऊ नका, ते जिवंत आहेत, मग असं का झालंय?

उत्तर प्रदेश काँग्रेसनं फोटो ट्विट केल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान काँग्रेसनंही आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन मणिशंकर अय्यर यांचे वेगवेगळ्या हावभावाचे फोटो आपआपल्या ट्वीटर हॅन्डलवरुन शेअर केले.

#RIPManiShankarAiyar ट्विटरवर ट्रेन्ड होतोय! गोंधळून जाऊ नका, ते जिवंत आहेत, मग असं का झालंय?
मणिशंकर अय्यर (Photo Source - Twiiter)
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 10:11 AM

मुंबई : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर (Congress Leader Mani Shankar Aiyar) यांच्याबाबत ट्वीटरवर वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. त्यानंतर ट्वीटरवर तर #RIPManiShankarAiyar असा हॅशटॅगही ट्रेन्ड होतो आहे. हा हॅशटॅगपाहून अनेक जण कोणतीही पडताळणी न करताच त्यांना आदरांजलीही देऊन मोकळे झाले आहेत. आता #RIPManiShankarAiyar असा हॅशटॅग ट्रेन्ड होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर या सगळ्याची सुरुवात झाली उत्तर प्रदेश काँग्रेसनं केलेल्या एका ट्वीटमुळे! सोमवारी यूपी काँग्रेसच्या (Up Congress) अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये मणिशंकर अय्यर यांचा फोटो काहीही कॅप्शन न लिहिताच शेअर करण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी आपआपल्या कुवतीनुसार या पोस्टचे अर्थ काढायला सुरुवात केली. यातील सगळ्यात पहिला अर्थ जो काढण्यात आला, त्याचा अनर्थ झाला आणि मग ट्विटरवर हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला. पण याला कारण फक्त यूपी काँग्रेसचंच ट्वीटर हॅन्डल होतं का? तर नाही!

का वाढला प्रकार?

उत्तर प्रदेश काँग्रेसनं फोटो ट्विट केल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान काँग्रेसनंही आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन मणिशंकर अय्यर यांचे वेगवेगळ्या हावभावाचे फोटो आपआपल्या ट्वीटर हॅन्डलवरुन शेअर केले. त्यामुळे ट्वीटरवरील युजर्स आणखीनंच गोंधळात पडले. काहीही कॅप्शन करताच काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेलया या मणिशंकर अय्यर यांच्या फोटोंवर युजर्स कमेंट करताना त्यांना श्रद्धांजली वाहू लागले आणि यातूनच #RIPManiShankarAiyar असा हॅशटॅग ट्रेन्ड होत गेला.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी अय्यरांची ओळख

मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मणिशंकर अय्यर हे चांगलेच चर्चेत आले होते. 2017 साली त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टीदेखील करण्यात आली होती. दरम्यान, 9 महिन्यांनंतर त्यांचं निलंबन मागेही घेण्यात आलं होतं. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीच मणिशंकर अय्यर हे ओळखले जातात. 132व्या नेहरु जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळेही अय्यर हे चांगलेच चर्चेत आले होते. सत्ताधारी पक्षाला वाटतं की भारतात फक्त 80 टक्के हिंदू आहेत. उरलेले 20 टक्के हे पाहुणे असून त्यांना आपण देशातून कधीही हाकलून देऊ शकतो, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं.

‘नीच’ वक्तव्याची आठवण!

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या ‘नीच’ शब्दाची पुन्हा एकदा आठवण आणि आता होत असलेल्या ट्वीटर ट्रेन्डचा एकमेकांशी संबंध आहे, अशीही कुजबूज सुरु झाली आहे. मणिशंकर अय्यर यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखात मोदींसाठी वापरलेला ‘नीच’ शब्द खरा ठरल्याचे म्हणत त्याचे समर्थन केलं होतं. मणिशंकर अय्यर यांनी डिसेंबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींना नीच म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. काँग्रेसनेही त्यांच्यावर याप्रकरणावरुन 2 वर्षांची निलंबनाची कारवाई केली होती. आता काहीही न बोलता फक्त मणिशंकर यांचा फोटो शेअर करत काँग्रेसनं अप्रत्यक्षपणे मोदींना टोला लगावला असल्याचंही बोललं जातंय.

जिवंत आहेत ना..?

80 वर्ष वय असलेले मणिशंकर अय्यर यांचा जन्म 10 एप्रिल 1941 रोजी झाला. त्यांच्याबाबतची अफवा पसरल्यानं अनेकांचा त्यांच्याबद्दल आता शंका वाटू लागली आहे. पण #RIPManiShankarAiyar हा हॅशटॅग ट्रेन्ड होण्यामागचा थेट संकेतही तोच होता. मात्र मणिशंकर अय्यर हे ठणठणीत असून त्यांचे फोटो नेमके शेअर का केले गेले, हा प्रश्नही कायमच आहे. तर दुसरीकडे काहींना तर मणिशंकर अय्यर यांचे फोटो शेअर होणं, ही बाब काँग्रेसचे ट्वीटर हॅन्डल हॅक झाल्याचा प्रकार वाटली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: महाराष्ट्राची राजकीय संस्कृती का ग्रेट आहे? शरद पवार-गोयलांचा हा व्हिडीओ पाहिलात?

Narendra Modi | ‘काँग्रेसला 100 वर्ष सत्तेतच यायचं नाही, असं वाटतंय’ मोदींच्या टीकेमागचं लॉजिक काय?

काँग्रेसचा पराभव का झाला? धन्यवाद प्रस्तावात नरेंद्र मोदींनीच सांगून टाकलं कारण! वाचा काय म्हणाले

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.