नागपूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्ष जरी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन आक्रमक झालेला असला तरी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. ते या सगळ्या प्रकारावर बोलतीलच पण भाजपला या प्रकरणाचं राजकारणच करायचं असेल तर मग आम्हाला भाजपचे आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल, अशी टीका काँग्रेस नेते मंत्री सुनील केदार यांनी केली. (Congress Sunil Kedar First reaction On Sanjay Rathod And pooja Chavan Suicide Case)